#

Advertisement

Monday, September 12, 2022, September 12, 2022 WIB
Last Updated 2022-09-12T18:10:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बहुजन रयत परिषदेचे आमदार निवडून येतील ; प्रत्येक निवडणुकीत आपली माणसं निवडून आणणार

Advertisement

महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले स्पष्ट

नाशिक : आगामी काळात गावच्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, विधानसभा अगदी लोकसभेसाठीही बहुजन रयत परिषद आपला उमदेवार राज्यभरातील मतदार संघात उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन रयत परिषदेचे आमदार निवडून येतील. यासाठी संघटना त्या उमेदवाराला ताकद देणार आहे. आता आपली माणसं मला निवडून आणायची आहेत. राज्यभरात बहुजन रयत परिषदेचे आमदार पाहिजेत, जिल्हा परिषद सदस्य पहिजेत आणि हे होऊ शकते. यासाठी एकत्र या, आपली एकी हीच आपली ताकद आहे, संघटना मोठी करा, असे आवाहन बहुतन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
नाशिक बहुजन रयत परिषदेतर्फे रविवारी (दि. 11) नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ तसेच समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणरा ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, प्रदेश सचिव ईश्वर क्षीरसागर सुरेश पाटू, ना.म.साठे, बालाजी गायकवाड, बबनराव गायकवाड, बबनराव नेटके, राज्य उपाध्यक्ष सुर्यकांत भालेराव, रविंद्र पाटील, साहेबराव शृंगार, धनंजय जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष नानासाहेब खंडाळे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राहुल विस्ते, नाशिक जिल्हा सरचिटणिस नाना जाधव, युवा जिल्हाध्यक्ष समाधान अहिरे, नाशिक शहर अध्यक्ष अंबादास अहिरे, नाशिक जिल्हा महिला संघटक मंदाताई पगारे, नाशिक महिला जिल्हाध्यक्षा शारदाताई भालेराव, राजु थोरात युवा नेते आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबई आग्रा रोडवरील बहिणाबाई महिला महाविद्यालयात सदर कार्यक्रम झाला.

ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणतात की....,
त्या म्हणाल्या की, समाजातील कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देण्याचे कार्य बहुजन रयत परिषद करीत आहे. ढोबळे साहेबांनी लावलेले रोपटे आता मोठे होऊ लागले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे. लवकर आपल्या संघटनेला राजकीय पक्षाची मान्यता आयोगाकडून मिळणार आहे. यासाठी आपली संघटना मोठी करा तुम्ही आपोआप मोठे व्हाल. संघटनेला विसरू नका, संघटना मजबूत भक्कम करा, असा सल्ला नेहमीच साहेब देत आले आहेत. साहेबांनी आपल्या समाजासाठी उभारलेली आपली संघटना मोठी झाली पाहिजे. आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, असे मला वाटते. संघटना मोठी झाली की पदं आपल्याकडे चालून येतात. त्याहीवेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पहिल्यांदा संधी देण्याचे धोरण आम्ही ठेवले आहे. त्यामुळे संघटना वाढवून मोठे व्हायचे, आपल्या बांधवांना मोठे करायचे की दुसऱ्या पक्षाच्या सतरंज्या उलचत राहायचे हे तुम्ही ठरवा.

कोमलताई हा मुद्दा केला स्पष्ट....
मित्रांनो.., आपली घरची संघटना सोडून काही जण इतर पक्षांची धुणीभांडी करायचे काम आजही करीत आहेत. आज राज्यातली राजकीय स्थिती काय आहे, हे माहित करून घ्या. मोठे पक्ष छोट्या पक्षांना तसेच संघटनांना वापरून घेण्याचे काम करत आहेत. पक्षनिष्ठा वैगरे आता फक्त थापा मारण्यापुरती उरली आहे. जो-तो आपला फायदा बघतो. मला खासदार व्हायचं, मला आमदार व्हायचं म्हणून जा त्या पक्षात, ये ह्या पक्षात, अशीच राजकीय ओढाओढ सुरू आहे. मोठे मोठे नेते सध्या अशा राजकीय परिस्थितीत भरडले जात आहेत. तिथं तुमच्या-आमच्या सारख्यांची काय गय. पक्ष मोठा आणि पोकळ वासा, अशीच सर्व राजकीय पक्षांची स्थिती झाली आहे. त्यामुळेच आज किती तरी जण केवळ व्यासपीठावर बसण्यापुरते आणि त्या पक्षाच्या नेत्यांच्या भाषणात टाळ्या वाजवणे एवढ्या पुरतेचे उरले आहेत. या गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला कुठे आणि कोणाबरोबर उभे राहायचे आहे. आजपर्यंत आपल्या समाज बांधवांचा वापर केवळ मतांसाठी झाला. आता, हे होऊ द्यायचे नाही. असे स्पष्ट करीत

कोमलताईंनी हा मुद्दा केला स्पष्ट....
बघू तुम्हाला निवडून येण्यापासून काणे रोखत ते? त्यांनी सांगितले की, संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत आहोत, ताकद वाढवत आहोत. नुसती संघटना मोठी करायची नाही तर त्यातली माणसंही मोठी झाली पाहिजेत, यासाठी आम्ही राज्यभर काम करीत आहोत, याचा अनुभव आम्हाला आला आहे. सोलापुरात संत दामाजी साखर कारखान्यावर आपल्या संघटनेच्या विचारांचे पॅनल निवडून आले. कारखाना आपल्या ताब्यात आला आहे. आता, पुढील निवडणुकांच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केली आहेत. याची माहिती कोणी घेतली आहे का? आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही माहिती घ्यावी, तुम्ही सांगा या ठिक़ाणी, या जागेवर आरक्षणात आपला माणूस बसतो आहे. ती जागा निवडून आणण्यासाठी सगळी मदत बहुजन रयत परिषद तुम्हाला करेल. पण, यासाठी फक्‍त संघटनेवर अवलंबून राहू नका. आपल्या भागात, आपल्या वॉर्डात, आपल्या वस्तीवर संघटना मोठी करा, तुम्ही कामाला लागा. बघू तुम्हाला निवडून येण्यापासून काणे रोखत ते? मी शब्द देते तुम्ही जर संघटनेबरोबर राहणार असाल तर साहेब आणि मी तुमच्या बरोबर आहे. आपल्या संघटनेची सगळी मातब्बर मंडळी तुमच्यासाठी तुम्ही सांगाल तिथं येईल. पण, यासाठी आपली एकी खूप महत्त्वाची आहे. समाज बांधवांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. नाहीतर निवडणुका आल्या की, काही पैशांसाठी आपली मत विकत घेणारे अनेक जण येतात. पण, यापुढे मत विकायची नाहीत तर आपलाच माणूस निवडून आणायचा आपली मतं वाढवायची. आपल्या परिषदेची ताकद एवढी मोठी करायची की, मुख्यमंत्री ठरवताना मंत्री पदाचं वाटप करताना आपल्या संघटनेला विचारलं गेले पाहिजे.
आता पक्ष कुठला का असेना त्या पक्षाला फक्‍त सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते पाहिजे असतात. आमदार, खासदारकी तर सोडाच साधी नगरसेवक पदासाठीही पक्ष उमेदवारी देत नाही. आपल्या समाज बांधवांना तर आरक्षित जागेवरही उमेदवारी दिली जात नाही. आता तर एक नवीनच फंडा आलाय. इतर पक्षातले निवडून येणरे उमेदवार कोणत्याही पद्धतीने हे पक्ष आपल्या पक्षात ओढून घेतात. त्यावेळी जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाते. ज्यांनी पक्षासाठी हयात घालवली त्यांना तुमच्यात निवडून येण्याची क्षमता नाही, असे सांगत आडगळीत टाकले जाते. त्यामुळे तुम्ही ठरवा असल्या पक्षाचे कार्यकर्ते व्हायचे की आपली संघटना मोठी करीत स्वत: मोठे व्हायचे.

या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रविंद्र वाकळे, उपाध्यक्ष बहुनाना गांगुर्डे, धुळे जिल्हाध्यक्ष ऍड. तुषार ससाणे, धुळे शहराध्यक्ष सागर कांबळे, नुदरबार जिल्हाध्यक्ष गणेश साठे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे, नगर जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गायकवाड यांच्यासह जिल्हा नेते अशोक साठे, जि.प.सदस्य बाळासाहेब शिरसाट, राजू कांबळे, ओमकार बाबा सपकाळे, दादाभाऊ बकुरे, रामभाऊ गवळी, देवाबाबा वारुंगसे, संजय शेजवळ, नारायण वैराळ, मरळगोईच्या सरपंच बेबीताई वैराळ, अमोल जाधव, संतोष साळवे, मंगेश शिरसाट, संदिप जाधव, सदाशिव सोळसे, विजय कांबळे, मार्कस भालेराव, शाखा अध्यक्ष सचिन सोनवणे, उ.म. महिला अध्यक्षा शितलताई भालेराव उपस्थित होते.

नाशिक जिल्हा, तालुका भक्कम कार्यरिणी :

तालुका अध्यक्ष तुषार बकुरे, दिंडोरी तालुका अध्यक्ष सोमनाथ साबळे, सोमनाथ साबळे, चांदवड तालुका अध्यक्ष गोरख पानपाटील, देवळा तालुका अध्यक्ष विजय जाधव, कळवण तालुका अध्यक्ष युवराज जमधडे, सटाणा तालुका अध्यक्ष अरुण शेलार, येवला तालुका अध्यक्ष नवनाथ पोळ, निफाड तालुका अध्यक्ष संतोष अस्वले, मालेगाव तालुका अध्यक्ष कैलास वाकळे, इगतपुरी तालुका अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, सुरगाणा तालुका अध्यक्ष लक्ष्मण गांगुर्डे, सटाणा शहर अध्यक्ष जितेंद्र देवरे, मनमाड शहर अध्यक्ष निशांत ढाके, निफाड तालुका कार्यध्यक्ष दत्तात्रय पवार, येवला शहर अध्यक्ष अमोल खैरनार, मालेगाव शहर अध्यक्ष संजय शेलार, निफाड शहर अध्यक्ष सौरभ अहिरे, विंचुर शहर अध्यक्ष किशोर पाचरणे निफाड युवक ता.अध्यक्ष दिपक कांबळे, येवला युवक ता.अध्यक्ष मोहित वोरात,
नाशिक तालुका महिला अध्यक्षा अनिताताई वाघ, सिन्नर तालुका महिला अध्यक्षा लक्ष्मीलाई साळवे, चांदवड तालुका महिला अध्यक्षा सरलाताई खैरनार, कळवण तालुका महिला अध्यक्षा उषाताई केदारे, येवला तालुका महिला अध्यक्षा सविताताई पोळ, नांदगाव तालुका महिला अध्यक्षा सुरेखाताई ढाके, मनमाड शहर महिला अध्यक्षा संगिताताई कांबळे, चांदवड शहर महिला अध्यक्षा कोमलताई साळवे, चांदवड तालुका महिला उपाअध्यक्षा जयाताई नेटारे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.