Advertisement
मुंबई : एक मुख्यमंत्री मंत्रालयात बसून काम करतील आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करतील असं म्हणत राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचे परखड भाष्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
पत्रकारांशी बोलत होत्या त्या म्हणाल्या की, मी स्वतः अनेक मंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या कामांसाठी वेळ मागितली पण ते वेळ देत नाही. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प आहे.हे सरकार ज्या पद्धतीने सांगितलं जाते ओरबडून आणि चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत आहे. प्रशासनाबरोबर काम करणाऱ्या मंत्र्यांची राज्याला गरज आहे असं मला वाटतं, अशी टीकाही सुळेंनी केली.
बारामतीच्या संदर्भात म्हटलं तर मी संविधान वरती विश्वास ठेवते. त्यावेळेस मला जेपी नड्डा यांचे वाक्य आठवतं की, या देशांमध्ये एकच पार्टी राहिली पाहिजे पण मी संविधानाप्रमाणे अनेक पार्टी राहावी या मताची आहे. बारामतीमध्ये कोणीही यावं त्यांचं स्वागत आहे , असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.