#

Advertisement

Tuesday, September 13, 2022, September 13, 2022 WIB
Last Updated 2022-09-13T10:18:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिर्डी विश्वस्त मंडळ बरखास्त

Advertisement

शिर्डी :  महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय रद्द झाला आहे.  शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. साईमंदिराचे राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश  औरंगाबाद हायकोर्टाने दिले आहे. आता 8 आठवड्यांमध्ये नवे विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागणार आहे. शिर्डीतील राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीसाठी  शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याचिका दाखल केलेली होती. आज या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला. आघाडी सरकारने साई संस्थानमध्ये विश्वस्त मंडळ स्थापन केले होते. विश्वस्तपदांसह अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणि विश्वस्त काँग्रेसचे वाटप असे झाले होते. आघाडी सरकारने 16 सदस्यांची केली नेमणूक केली होती. पण साईसंस्थानच्या घटनेनुसार या मंडळाची नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.