Advertisement
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्ह ट्वीटरवर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारला लावण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत त्यांच्यावर आरोप केले. परतु, आशिष शेलार या ट्वीटवरून जोरदार ट्रोल झाले आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. हा दंड पुढच्या दोन महिन्यात भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून आशिष शेलारांनी मुंबई महापालिका आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली परंतु या टीकेवर नेटकऱ्यांनी मात्र शेलारांचा चांगलंच सर्जीकल स्ट्राईक केले आहे.
शेलारांनी ट्वीटमध्ये म्हंटल आहे कि, मग आता.. ‘सांग सांग भोलानाथ…हा दंड पालिकेमध्ये सत्ता असलेल्यांकडून, अडीच वर्षे पर्यावरणमंत्री असलेल्यांकडून की, सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनेकडून वसूल करायचा का? असा प्रश्न उपस्थित करत, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचले आहे.
यावरून नेटकरी मात्र चांगलेच संतापलेले दिसत आहेत. यातील एका नेटकऱ्यांने म्हंटले आहे कि, जनाब आशिष शेलार उर्फ कुरेशी मियां…भाजपची दलाली करून लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे बंद करा आता... तुमचं पितळ उघडं पडलं आहे… तुम्ही कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी मुंबईकर तुम्हाला तोंडावर पाडणार. कारण सगळ्यांना कळून चुकलं आहे.