Advertisement
नाशिक : कुसुमाग्रज प्राथमिक विद्या मंदिरमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य ज्ञान, गीत गायन, नृत्य सादरीकरण, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा झाला, यपा विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या गुणगौरव सोहळ्यात शाळेच्या मुख्याध्यापिका एस.के. पवार तसेच शिक्षकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मुख्याध्यापिका पवार यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती स्नेहा अहिरे यांनी केले. शीतल मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.