#

Advertisement

Thursday, September 15, 2022, September 15, 2022 WIB
Last Updated 2022-09-15T10:34:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वेदांता फॉक्सकॉनचा क्लोजर रिपोर्ट अजित पवारांनी का दिला नाही !

Advertisement

पुणे : 'वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजराजला जाण्यावरून राजकीय वाद पेटला आहे. पण, हा वाद राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामुळे निर्माण झाला आहे. त्यांना सगळी माहिती असेल, त्यांनी या प्रकल्पासाठी क्लोजर रिपोर्ट का दिला नाही, असा गंभीर आरोप बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजराजला जाण्यावरून वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवरच निशाणा साधला आहे. मविआ सरकार असताना अजित पवारांनी या प्रोजेक्टचा क्लोजर रिपोर्ट का दिला नाही. या प्रकल्पला 12 हजार कोटींची सबसिडी म्हणा किंवा बेनिफीट देणार होते. तर दुसरीकडे 26 हजार कोटी वार्षिक उत्पन्न होईल, असं सांगितलं जात आहे. पण या ज्या नऊरत्न कंपन्या आहे, या कंपन्यांचं जेवढं उत्पन्न आहे, अजून केंद्राला सुद्धा नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. देवेंद्र फडणवीस आल्यानंतर उकाईचं पाणी सुद्धा गुजरातला गेलं होतं. त्यामुळे नवीन काही नाही. जिथे जिथे फडणवीस असतील तिथे हे प्रश्न येतील. भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत आले तेव्हा अर्धे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.