#

Advertisement

Wednesday, September 14, 2022, September 14, 2022 WIB
Last Updated 2022-09-14T18:07:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मंगळवेढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित

Advertisement

मंगळवेढा : लम्पी या विषाणू आजारापासून मंगळवेढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित आहे. 49,342 गायी तर 42,503 म्हैस असे एकूण 91,845 पशुधनावर पशुसंवर्धन विभाग लक्ष ठेऊन असल्याचे पंचायत समिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. सुहास सलगर यांनी सांगितले.
जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाकडून येत्या तीन दिवसात लस प्राप्त होणार असून सर्व पशुंना लसीकरण करण्यात येणार असल्याचेही डॉ. सलगर यांनी सांगितले. मंगळवेढा तालुक्‍याला लगत कर्नाटक राज्य असल्याने कर्नाटकातून मंगळवेढ्याकडे पशु विक्रीसाठी येणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात असून मरवडे येथील चेकपोस्टला कर्नाटकातून येणाऱ्यांना पायबंद घालावा अशी लेखी पत्र दिले असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. लम्पीच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी पशुसंवर्धन विभागाचे सुहास सलगर, डॉ. पांडुरंग हंबरडे, डॉ. ब्रह्मानंद कदम, डॉ. रविंद्र बंडगर, डॉ. विजय गायकवाड, तानाजी भोसले, अविनाश पांगे, विक्रम शिंदे आदि कर्मचाऱ्यांच्या टिम तयार करण्यात आल्या असून हे कर्मचारी जातीने या आजारावर लक्ष ठेवून आहेत.