#

Advertisement

Thursday, September 15, 2022, September 15, 2022 WIB
Last Updated 2022-09-15T10:41:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

गेलं ते गेलं, नवीन काय आणता येईल ते बघायला हवं !

Advertisement

पुणे : गुजरातला काही गेलं तर तक्रार करायची गरज नाही. आता ते दोघं गुजरातचे आहेत. घराकडे ओढ असणं साहजिक आहे. आता जे गेलं ते गेलं, नवीन काय आणता येईल ते बघायला हवं,' असं विधान शरद पवार यांनी केलं. 
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना शरद पवार यांनी याबाबत भूमिका मांडली. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. यानंतर पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला आणखी मोठा प्रोजेक्ट देण्याचं आश्वासन मिळाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं, यावरही पवारांनी टोला हाणला. लहान मुलाची समजूत काढावी, तसं पंतप्रधान बोलले आहेत, असं वक्तव्य पवारांनी केलं. रोज काय झाड डोंगर दाखवता, आता राज्याचा विचार होण्याची गरज आहे. राज्य सरकार इतर बाबतीत फार गतिमान आहे,' अशी बोचरी टीकाही शरद पवारांनी केली.