#

Advertisement

Friday, September 16, 2022, September 16, 2022 WIB
Last Updated 2022-09-16T12:11:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

संजय राऊत यांच्या जामिनाला "इडी"चा विरोध

Advertisement

मुंबई : संजय राऊत यांच्या जामिनाबाबत कोर्टाने इडीला उत्तर द्यायला सांगितलं होतं. इडीने कोर्टापुढे हे उत्तर सादर करत संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला आहे. या पत्रामध्ये इडीने काही महत्त्वाचे दावे केले आहेत. पत्राचाळ आर्थिक घोटाळ्यात संजय राऊत सहभागी असल्याचा पुरावा आहे. 1039 कोटी 79 लाखांच्या पत्राचाळ घोटाळ्याचा तपास हा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असं इडीने कोर्टाला सांगितलं आहे.
संजय राऊत यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे आहेत, त्यामुळे अधिक सखोल तपास करायचा आहे, असं इडीने 8 ऑगस्टला सांगितलं होतं. या व्यवहारात 1 कोटी 6 लाख आणि 1 कोटी 17 लाख ही रक्कम खात्यात मिळाल्याचा पुरावा आहे, पण, ही रक्कम संशयास्पद असल्याचा इडीचा दावा आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातील 1 कोटी 8 लाखांचं ट्रान्झाक्शन संशयास्पद आहे.  त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना जामीन देण्यास इडीने विरोध केला आहे.