#

Advertisement

Thursday, September 15, 2022, September 15, 2022 WIB
Last Updated 2022-09-15T11:40:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय रद्द

Advertisement

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर शिंदे सरकारने आधीचे निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला आहे. आता पुन्हा एकदा शिंदे सरकारकडून सर्व अशासकीय नियुक्त रद्द करण्यात आल्या आहेत. आता नव्याने शिंदे सरकारकडून अशासकीय नियुक्त जाहीर केल्या जाणार आहे. राज्यात नवे सरकार आल्यावर आता आधीच्या महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विविध महामंडळ, प्राधिकरण, समित्या, सरकारी उपक्रम आणि मंडळं यावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागांना दिले आहेत. या आदेशानुसार १६ सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द होणार असून महिनाभारत शिंदे-फडणवीस सरकार नव्या अशासकीय नियुक्त्या जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.