Advertisement
पिंपरी-चिंचवड : भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीची चर्चा आहे. पण, 'राज ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही, पुढे तशी चर्चा होईल, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे यांनी मनसेसोबत युतीवरही भाष्य केलं, पक्ष संघटना मजबूत करणे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना विरोध करणे असा होत नाही. एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असेल तर त्याला संपूर्ण ताकद आणि पाठबळ देण्याचे काम भाजप करेल, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मनसे भाजप युती संदर्भात देखील बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं.