Advertisement
मुंबई : आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या संजय राऊत यांची भेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घ्यायची आहे. जेलर कार्यालयात भेट घेता येईल का? अशी ठाकरे यांच्या कार्यालयाकडून आर्थर रोडच्या जेलरना विचारणा करण्यात आली आहे. यावर कोर्ट नियम व अटी लागू , असं उत्तर आर्थर रोड कारागृहाच्या अधिक्षकांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाला दिलं आहे. इतर कैद्यांना जशी भेटण्यास परवानगी मिळते तशी परवानगीस कारागृहाच्या प्रशासनाने कळवल आहे, पण उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांची स्वतंत्र भेट हवी आहे. जर स्वतंत्र भेट हवी असेल तर कोर्ट परवानगी आवश्यक असल्याचं कारागृह प्रशासनाने ठाकरे यांच्या कार्यालयाला कळवलं आहे. ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत राऊत हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.