#

Advertisement

Wednesday, September 7, 2022, September 07, 2022 WIB
Last Updated 2022-09-07T12:56:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

दसरा मेळाव्याला शिवसेनेला मोठा धक्का बसणार

Advertisement

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक हे ऐन दसरा मेळाव्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याने दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. 
एकीकडे दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. आता  शिंदे गट ठाकरे गटाला झटका देण्याच्या तयारीत आहे.   दसरा मेळाव्या दरम्यान ठाकरे गटातील अनेक नेते, नगरसेवक आणि काही आमदार शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.  शिंदे गट दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करत आहे. यावेळी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी हे शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. शिवसेनेतील 40 आमदार आणि अनेक पदाधिकारी व नगरसेवक हे शिंदे गटात दाखल झाले आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिंदे गटात शिवसैनिक सामील होणार ते खासदार आणि आमदार कोण आहे, याची चर्चा आहे.