#

Advertisement

Thursday, September 29, 2022, September 29, 2022 WIB
Last Updated 2022-09-29T10:35:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे !

Advertisement


जयपूर : इंदिरा गांधीच्या कार्यकाळातही शिवाय कोणीही पक्षाचा अध्यक्ष असला तरी काँग्रेसने नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला. आमदाराच्या त्या बैठकीनंतर अनेकांना धक्का बसला होता. सर्वांना वाटत होतं की, मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. या सर्व प्रकरणानंतर मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे.
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. साधारण दीड तास ही बैठक सुरू होती. मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय सोनिया गांधी घेतील. मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे.  याशिवाय ते काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं. ते जेव्हा सोनिया गांधींना भेटायला गेले, तेव्हा त्यांच्या हातात माफीनामा असल्याचंही सांगितलं जात आहे.