#

Advertisement

Thursday, September 15, 2022, September 15, 2022 WIB
Last Updated 2022-09-15T10:52:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

"त्यांच्या" विधानांची गमंत वाटते !

Advertisement

पुणे उद्योगमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं ते म्हणाले,  गेल्या वेळच्या सरकारची ही जबाबदारी आहे, गंमत आहे उदय सामंत हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ते आणि एकनाथ शिंदे हे मंत्री होते. त्यामुळे दोघेही मंत्रिमंडळामध्ये होते. त्यामुळे तेच आता बोलत आहेत. त्यांच्या विधानांची गमंत वाटते, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला. 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन वेदांता प्रकल्प  मुद्यावर शिंदे सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी मदत करत असतील तर आनंद आहे. आणखी एक मोठा प्रकल्प राज्याला मिळणार आहे असं सांगण म्हणजे, एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान मुलाला खोबरा दिला अन् दुसऱ्या मुलाला दिला नाही आणि त्याच्यापेक्षा तुला मोठा खोबरा देऊ असं सांगणे, याच प्रकारे पंतप्रधान मोदींनी शिंदेंनी समजूत काढली, असा टोलाही पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.