Advertisement
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्यात दिली ग्वाही
अहमदनगर : पाणी पुरवठा खाते ढोबळे साहेबांकडे असताना नगर जिल्ह्याला त्यांनी याबाबत न्याय दिला. यामुळे नगर जिल्हा ढोबळे साहेबांना कधीही विसरणार नाही, आजही प्रकृती ठीक नसतानाही ढोबळे साहेब औषध उपचार घेऊन नगर येथे होत असलेल्या कार्यक्रमास येण्यासाठी निघाले आहेत. हा माणूस माणसात रमणारा आहे. स्वत:ला झोकून देऊन काम करणारा आहे. ढोबळे साहेबांनी राज्यपातळीवरील कोणताही निर्णय घेऊ द्यात, नगर जिल्हा त्यांच्यामागे ठाम उभा राहिल, अशी ग्वाही देत असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.अहमदनगर बहुजन रयत परिषदेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीचे आयोजन ओम गार्डन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे, महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे, युवाध्यक्ष अभिजीत दादा ढोबळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.ना.म.साठे, प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, कॉ.अनंत लोखंडे, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र वाकळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
आमदार जगताप म्हणाले की, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी बहुजन रयत परिषद उभारली. राज्यात मोठी ताकद निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत. या माध्यमातून ते दुर्लक्षीत समाज घटकांना एकत्र आणत आहेत, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत आहेत. राज्यात, जिल्ह्यात अगदी गाव पातळीवरही ढोबळे साहेब सातत्याने काम करीत आहेत. आमच्या सारखे पदाधिकारी, कार्यकर्ते गेली 20-25 वर्षे साहेबांच्या कामाचा अनुभव घेत आहेत. मंत्री पदावर काम करीत असताना ढोबळे साहेबांनी आपल्याला जे खाते मिळाले, त्याची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी नगर जिल्ह्याला सर्वच बाबतीत न्याय दिला. आजही येथील लॉ-कॉलेजच्या माध्यमातून आपल्या येथील लोकांच्या संपर्कात ते असतात, त्यांचे प्रश्न जाणून घेतात, त्यांना मदत करतात, प्रश्न सुटण्यासाठी मार्गदर्शन करतात. वेळ प्रसंगी संबंधीत अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधतात.
ढोबळे साहेबांच्या या संस्कारातून साहेबांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे या महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत, त्यांच्याकडेही समाज वेगळ्या अपेक्षेने पाहत आहे. आपल्या सर्वांची साथ असल्याने निश्चितच बहुजन रयत परिषदेला राज्यात मोठे स्थान प्राप्त होईल. ताई आपण या चळवळीच्या माध्यमातून संघटन निर्माण करून सर्वांना पुढे घेऊन जात आहात. आपल्या नगर जिल्ह्यातील सर्व मंडळी ऍक्टीव्ह आहेत. भविष्यात या सर्वांच्या माध्यमातून चांगले काम उभे राहिल, ज्या-ज्या वेळी तुम्ही काही भूमिका राज्य पातळीवर घ्याल त्या-त्या वेळी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रतिसाद नगर जिल्ह्यातून मिळेल, अशी खात्री देत असल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले.
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, महिला बचत गट हा शासनाचा उत्कृष्ट उपक्रम आहे. पण केवळ माहिती अभावी ते सक्षमपणे चालत नाहीत. बचतगट सहा महिने चांगला चालविला तर तुम्ही लघुउद्योग उभे करू शकता. त्यासाठी मनाप्रमाणे नव्हे तर शासनाच्या नियमाप्रमाणे बचतगट सुरू करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केवळ दलित मागासवर्गीय यांचे हित पाहिले नाही तर संपूर्ण देशातील बहुजन समाजाचे हित पाहिले असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोरोना सारख्या महामारीमुळे बॅंड पथकांना व कलावंतांना काम नव्हते. बहुजन रयत परिषदेने घेतलेल्या कार्यक्रमातून कलावंतांना कला सादर करण्याचे काम या अहमदनगर जिल्ह्याने केले, याचाही उल्लेख त्यांनी केला.
बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.ना.म.साठे यांनी प्रास्ताविकात बहुजन रयत परिषदेच्या जडण घडणीत माजी मंत्री व संघटनेचे संस्थापक प्रा. ढोबळे साहेबांचा किती मोलाचा सहभाग आहे, याची माहिती दिली. गाव तेथे परिषदेची शाखा करणार असल्याची भूमिका मांडली.
यावेळी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट कलावंतांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार महेश भोसले, संतोष गोरखे, शुभम पाचारणे, सचिन मोकळ, भारत पवार, मेजर भिमराव उल्हारे, उमेश साठे, यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाहीर अशोक शिरसागर यांनी अण्णा भाऊ साठे यांची गीते सादर केली. कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील वाटेगाव या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गावावरून आलेले त्यांचे वंशज, नातू सूरज साठे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्योजक-जिल्हाअध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान नवगीरे, जिल्हा सरचिटणीस संतोष साळवे, जिल्हा युवाध्यक्ष भगवान मिसाळ, जिल्हा संपर्क प्रमुख विलास सुर्यवंशी, शहर अध्यक्ष सतीश थोरात, संघटक लहू सुलाखे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास साहेबराव पाचारने, विजय वडागळे, अप्पा घोडके यांच्यासह यावेळी सामाजिक कार्यकर्ते ऍड. नितीन पोळ, डॉ. पवार, सत्यवान शिंदे, अंकुश मोहिते, मधुकर पठारे, साहेबराव पाचारणे, वामनमामा पगारे, नानासाहेब ससाणे, विजय वडागळे, भगवान जगताप, सुनिल उमाप, सुनिल सकट, सुनिल भोसले, किरण उमाप, बबन भोसले, गुलाब तोरडमल, प्रविण वाघमारे, राजेंद्र त्रिभुवन, कांतीलाल जगधने, भास्कर लोखंडे, धनंजय लोखंडे, आयुब शेख, तानसेन विवाल, संजय (भाऊ) ताकवाले आदींसह जिह्यातील व शहरातील कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदनगरचे लढवय्ये बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी
भाऊसाहेब उडाणशिवे (मा. नगरसेवक), सागर आळकुटे (भिंगार, शहराध्यक्ष), आण्णासाहेब बन्सी थोरात (नेवासा, अध्यक्ष), रतन ससाणे (श्रीगोंदा, तालुकाध्यक्ष), अनिल शिंदे (श्रीगोंदा, कार्याध्यक्ष), गणेश ससाणे (शहराध्यक्ष, श्रीगोंदा), सुरेश नवगिरे (पाथर्डी, तालुकाध्यक्ष), रामदास शिवराम ससाणे (राहुरी, तालुकाध्यक्ष), बाबासाहेब शेलार (राहुरी, संघटक), प्रविण भारस्कर (शेवगांव, तालुकाध्यक्ष), अरुणकुमार बाबरे (राहता, तालुकाध्यक्ष), सतिश बोरुडे (नगर, शहर कार्याध्यक्ष), खंडू रणसिंग, सोनाजी जाधव, सनी पाचारणे, प्रसाद साळवे, आकाश शिंदे, सागर सकट, नंदू जगताप, अशोक पवार, डी.जी. कोतकर, रावसाहेब जाधव, सिकंदर धोत्रे, गणेश आळकुटे, महेश पवार, आकाश नवगिरे, बाळासाहेब पाचारणे, रवी गुंडकर, बाबासाहेब पवळे, प्रदिप मोहिते, दत्तू मिसाळ, विष्णू मिसाळ, संतोष बालाई, संजय शिंदे, सचिन भारस्कर, काळू चव्हाण, दादासाहेब भोंगळे, महेश साळवे.

