Advertisement
कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत येणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे, पण कोल्हापूरमध्ये शिंदे गटाला धक्का बसला आहे. कोल्हापूरचे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. अवघ्या 15 दिवसांमध्येच फराकटे शिंदे गटातून परतले आहेत. आपण मालोरीराजे आणि सतेज पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचं दिगंबर फराकटे यांनी स्पष्ट केलं आहे. फराकटे यांनी पत्रक काढत शिंदे गटातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये 15 दिवसांपूर्वी दिगंबर फराकटे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.
