Advertisement
पुणे : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची बारामती लोकसभा मतदार संघाची बैठक आज धायरी येथील मुक्ताई गार्डन येथे पार पडले. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी राम शिंदे यांच्याकडेही जबाबदारी आली आहे. त्या अनुषंगाने भाजपचे सर्व पदाधिकारी आमदार जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीचे नियोजन केले होते. पत्रकारांशी बोलताना राम शिंदे म्हणाले की येणारी आगामी लोकसभा निवडणूक मध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महाराष्ट्र मध्ये 16 लोकसभा जागेवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे त्यापैकी एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती. येणारे लोकसभेची निवडणूक अवघ्या 18 महिन्यांवर येऊन ठेपली आहे त्यासाठी बैठकीचे नियोजन सूक्ष्म नियोजन संख्यात्मक गुणात्मक नियोजन कार्यकर्त्यां ना मार्गदर्शन आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची या मतदारसंघात भेट आणि नियोजन असा कार्यक्रम आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही बारामती लोकसभा मतदारसंघ दौरा आयोजित केला आहे त्यामुळे या दौऱ्याचा कार्यकर्त्यांना फायदा होणार आहे. आतापर्यंत या मतदारसंघात आपल्यापेक्षा कोणीही मोठा होऊ नये अशी वृत्ती होती परंतु आता मतदारसंघ झाले आहेत आणि यावेळेस ते नक्कीच बदल घडवतील. मग त्यावेळेस हर्षवर्धन पाटील इंदापूरचे भाजपमध्ये आले आह गेल्या वेळेस इंदापूर भागातून आम्हाला लीड मिळाला नव्हता यावेळेस हर्षवर्धन पाटलांमुळे ती कमी भरून निघेल.
विधानसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पक्षाने आपल्याला बारामती लोकसभा चे प्रभारी म्हणून नियुक्त केले का असा प्रश्न विचारल्यावर शिंदे म्हणाले की मी गेल्या 30 वर्षापासून भाजपचे काम करत आहे पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पडत आहे आणि यावेळेस पक्ष जिंकला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे. या बैठकीस आमदार भीमराव तापकीर, राजाभाऊ लायगुडे, यशवंत लायगुडे, सचिन मोरे, अरुण राजवाडे, वर्षा तापकीर,दीपक नागपुरे,सारंग नवले,सुशांत कुटे , भाजप पदाधिकारी उपस्थित होते.