Advertisement
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे , भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गट यांच्यातली जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत चालली आहे, त्यातच आता राज ठाकरे यांनी अचूक टायमिंग साधलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे गेले आहेत. वर्षा बंगल्यावरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे गेले असले, तरी त्यांच्या या टायमिंगची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.
वर्षा बंगल्यावर आज भाजप आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते तसंच आमदारांच्या स्नेहभोजनाचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या काही वेळ आधीच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत. आता राज ठाकरे भाजप-शिवसेनेच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.