#

Advertisement

Friday, September 16, 2022, September 16, 2022 WIB
Last Updated 2022-09-16T12:27:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आदित्य ठाकरेंची भर पावसात सभा ; प्रचंड गर्दी

Advertisement

सिंधुदुर्ग : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी पाऊस "संधी" घेवून आला आहे. आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची शिवसंवाद यात्रा आज रत्नागिरीत येवून पोहोचली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवसंवाद यात्रेतील आदित्य ठाकरेंची भव्य सभा आयोजित करण्यात आली. या सभेला आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ आलेल्या शिवसैनिकांची भर पावसात प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. एकीकडे मुसळधार पाऊस पडतोय. दुसरीकडे आदित्य ठाकरेंची सभा, शिवसैनिकांमधील उत्साह अजिबात कमी झालेला नाही. शेकडो शिवसैनिक हातात छत्री घेवून शिवसंवाद यात्रेसाठी दाखल झाले. ही गर्दी आणि पाऊस आदित्य ठाकरेंकडे खरंच काही संधी घेवून येतेय का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण, सध्याचं पावसाचं वातावरण तरी आदित्य ठाकरे यांच्यासाठी चिपळूणमध्ये पोषक आहे, असं दिसत  आहे. कारण भर पावसात शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्या सभेला गर्दी केली. यामध्ये महिलांचा प्रचंड समावेश आहे.