Advertisement
वर्धा : वर्धा कारागृहात दोन कैद्यात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दुपट्ट्यात दगड बांधून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. ही घटना बराक क्रमांक 8 मध्ये रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेची नोद वर्धा शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. शिक्षाधीन बंदी आणि न्यायदीन बंदीवानात अगदी किरकोळ कारणातून झालेल्या वादात शिक्षाधीन बंदीवानाने न्यायदीन बंदीवानाला दुपट्ट्यात दगड बांधून डोक्यावर मारहाण केली. ही घटना वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक 8 मध्ये रात्रीच्या सुमारास घडली. कपिल नंदकिशोर आखाडे (वय 26, रा. मारोती वॉर्ड हिंगणघाट) असे जखमी न्यायदीन बंदीवानाचे नाव आहे. तर शेख तौफिक शेख शाकीर असे हल्ला करणाऱ्या शिक्षाधीन बंदीवानाचे नाव आहे. या प्रकरणी तुरुंग प्रशासनाने वर्धा शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
