Advertisement
पुणे : राज्य सरकारच्या फक्त गाठीभेटी आणि गृह भेटी सोडून फारशा काही बातम्या दिसत नाहीत. तसेच त्यांचे जे दौरे दिसतात ते सुद्धा एक किलोमीटरच्या आतले असतात. ज्या ज्या वेळी मी टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
राज्यातील हे सरकार साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून ओरबाडून आणले गेले आहे. या लोकांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात. मात्र, अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाही आहेत. ज्या उत्साहाने आमचे सरकार पाडलं गेलं त्या उत्साहाने कामे होत नाहीत.
आता राज्यात कुठेही पालकमंत्री नाहीत. कोरोना असो किंवा नसो विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळी 6 वाजेपासून काम करत असायचे. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. तसेच दर शुक्रवारी त्यांच्या मॅरेथॉन मिटिंग व्हायच्या. मात्र, आता पालकमंत्रीच नाहीत. म्हणून कामेही होताना दिसत नाहीत, अशी टिकाही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली.