#

Advertisement

Monday, September 5, 2022, September 05, 2022 WIB
Last Updated 2022-09-05T10:26:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

संजय राऊत यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला

Advertisement

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांच्या जेलमध्ये मुक्काम वाढला आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला आहे. आज राऊत यांना पुन्हा PMLA न्यायालयात हजर केले असता संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज केला नाही. त्यामुळे ईडीने न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत वाढ केली आहे. तसंच, न्यायालयाने राऊत यांना संसदीय कामकाजाबाबत पत्रांवर सह्या करण्यास परवानगी दिली आहे.