Advertisement
गडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांना यांना कर्करोगाचे निदान झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते तीन महिन्यानंतर कर्करोगावर मात करुन डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसात पोहोचले त्यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
डॉक्टर प्रकाश आमटे यांना तीन महिन्यापूर्वी कर्करोगाचा निदान झाले होते. प्रकाश आमटे पुण्यात असताना त्याची प्रकृती बिघडली होती. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांना कर्करोगाचे निदान झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टर प्रकाश आमटे यांची प्रकृती कधी बरी होत होती तर कधी बिघडत होती. आमटे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असताना त्यांचे सगळे आमटे कुटुंब त्यांच्यासोबत होते. या आजाराच्या विरोधात डॉक्टर प्रकाश आमटे यांनी अत्यंत खंबीरपणे लढा दिला आणि कर्करोगावर मात केली.