Advertisement
औरंगाबाद : 'तो फालतू पानटपरीवाला भाषणात मी बाळासाहेबांमुळे मोठा झालो म्हणायचा. आता उद्धव ठाकरेंच्या मुलाला तुम्ही असं बोलता. गुलाबराव पाटलांना गोधडी दाखवून देतो. संभाजीनगरमध्ये ये, तुझी हिंमत पाहतो. भ्रष्टाचार किती केला हे माहिती आहे. आम्ही सोडणार नाही,' असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदेंसोबत गेलेले शिवसेना आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेबांचं बोट पकडून भाजप मोठी झाली. 2002 गुजरात दंगलीनंतर बाळासाहेबांनी मोदींना पाठिंबा दिला. बाळासाहेबांचा निरोप घेऊन आपण मोदींची भेट घ्यायला अहमदाबादला गेलो होतो. मी स्वत: तेव्हा मोदींना भेटलो आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आलो आहोत. सगळे शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत, असं मी मोदींना सांगितलं. तेव्हा बाळासाहेबच मला आशीर्वाद देतात, माझ्या पक्षाचे लोक मला काढायला तयार आहेत, असं वक्तव्य मोदींनी केलं,' असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.