Advertisement
भोसरी : इंद्रायणीनगर येथील शाहू शिक्षण संस्थेतर्फे गणेशोत्स मोठ्या उत्साहात
साजरा केला जात असताना संस्थेच्या संचालिका ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या
मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाहू शिक्षण संस्था
संचलित राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेजच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या लिटीगंट
लिगल ऍन्ड क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर
आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोरवाडी कोर्टातील वकिलांकडून मार्गदर्शन
करण्यात आले. ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या स्वत: या शिबिरात मार्गदर्शक म्हणून
सहभागी झाल्या होत्या. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या शिबिराची सांगता सायंकाळी
चार वाजता झाली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा
लाभ दिवसभरात 1200 पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला. ऍड. गोसावी, ऍड. संतोष तापकीर, ऍड.अच्युत घाडगे, ऍड. गौरी बिडकर, ऍड. अजित बोराडे, ऍड. अनुप अवस्थी, ऍड. प्रतिक्षा बोतरे आदी विधीतज्ज्ञांनी या शिबिरात फौजदारी तसेच दिवाणी दावे याविषयी मार्गदर्शन तसेच सल्ले दिले. या शिबिरामध्ये महसूल विषयक समस्यांची संख्या अधिक होती. त्यानुसार संबंधीतांना योग्य तो सल्ला देण्यात आला. बऱ्याच वेळा योग्य सल्ल्याअभावी चुकीच्या पद्धतीने दावे हाताळले जातात, यातून अशिलांचे नुकसान होते, या पार्श्वभूमीवर सदर कायेदविषयक मार्गदर्शन शिबिर फायेदशीर ठरल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. | |||