Advertisement
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 100 कोटी वसूली प्रकरणात ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत. आता पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयातील मुक्काम वाढला आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना 27 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी विशेष कोर्टात आज अनिल देशमुख, संजीव पलांडे यांना हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मागील वर्षी 2 नोव्हेंबर रोजी देशमुख यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.