Advertisement
हिंगोली : शिवसेनेशी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करणाऱ्या गद्दारांनी त्यांच्या बापाच्या जागेवर बाळासाहेबांचे नाव लावावे, असे थेट आव्हान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केले आहे. ते हिंगोली दौऱ्यावर आहेत शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भास्कर जाधव यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.
बंडखोर आमदार बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत आहेत. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत विचारणा केली असता भाजपची काही चाणक्य मंडळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते आहेत, ते राष्ट्रीय नेते आहेत, असे वारंवार सांगत आहेत. तुम्ही एवढेच प्रमाणिक आहात, तर बापाच्या जागेवर बाळासाहेब ठाकरेंचे नाव लावा. आम्हाला वाईट वाटणार नाही, आम्हालाही तुमची निष्ठा बघायची आहे. केवळ पाप लपवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जातो, असा घनाघातही भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला आहे.