Advertisement
पुणे : श्रीलंकेतील नेते पळून गेले, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पळून जावे लागणार आहे, अशी टीका भाजपचे विधानपरिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. भाजपकडून मिशन बारामती या निमित्ताने आयोजित मेळाव्यात पडळकर बोलत होते.
बारामतीत चंद्रशेखर बावनकुळे आले आहेत. एखाद्याला फसवून घ्यायचे, लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आनंद असतो. जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या फिरत होत्या. आता निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांनाही नाही, अशी टीका पडळकर यांनी केली. पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते. माझ्यावर खूप केसेस आहेत. या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा. तसेच बारामती हा बालेकिल्ला नसून शरद पवारांची टेकडी आहे आणि मी ही टेकडी दोन वर्ष ठोकून काढत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.