#

Advertisement

Wednesday, September 14, 2022, September 14, 2022 WIB
Last Updated 2022-09-14T17:38:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेकर यांचं निधन

Advertisement

मुंबई : 'राजसा जवळी जरा बसा'. या लावणीनं लाखो प्रेक्षकांना वेड लावलं. या लावणीवर अदाकारी करुन ही लावणी अजरामर करणाऱ्या लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेर यांचं निधन झालं. त्या 90 वर्षांच्या होत्या. उभं आयुष्य लावणीसाठी खर्ची करणाऱ्या गुलाबबाईंचं वृद्धापकाळानं निधन झालं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत आणि बैठकीच्या लावणीची अदाकारीसाठी गुलाबबाई संगमनेकर प्रसिद्ध होत्या. त्यांना नृत्यचंद्रिका म्हणून ओळखलं जात होतं.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही लावणी आजही तितक्याच आवडीनं ऐकली आणि नाचली जाते. लता दीदींनाही ही लावणी विशेष आवडायची आणि ही लावणी गुलाबबाईंनी करावी, अशी इच्छा लता दीदींनी  व्यक्त केली होती. लता दीदींच्या शब्दानुसार गुलाबबाईंनी दर्जेदार लावणी सादर केली होती. ही लावणी आज अजरामर झाली आहे.