#

Advertisement

Wednesday, September 14, 2022, September 14, 2022 WIB
Last Updated 2022-09-14T17:32:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

गरबा येईल तेव्हा ते गरागरा फिरतील...

Advertisement

मुंबई : एअर बसचा मोठा प्रकल्प आहे, त्याचा पाठपुरावा लवकर करा, कारण नवरात्र येत आहे. तुम्हाला मंडळांना भेटायला जायचं आहे, परत वेळ मिळणार नाही. मुख्यमंत्री गणपती मंडळात फिरत होते, आता गरबा येईल तेव्हा ते गरागरा फिरतील, त्यांनी जरा कामावर लक्ष द्यावं,' असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रोजेक्ट महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्यानंतर  या मुद्यावरून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊ असं म्हणाले ते सोडून दिलं. मग इन्श्युरन्स देऊ म्हणाले तेही सोडून दिलं. हे फक्त जाहीर करतात आणि सोडून देतात. जीत के हारने वाले को खोके सरकार कहते है. आम्ही केंद्र सरकारबद्दल बोलतच नाही. केंद्र सरकारसोबत नीट चर्चा झाली असती तर झालं असतं, पण या सरकारचं लक्ष नाही, कोणाचेही नियंत्रण नाही. रोजगार निघून जात आहेत. आमच्यासोबत गद्दारी केली तशी या राज्यातील तरुणासोबत गद्दारी करू नका,' अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.