Advertisement
मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आज भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीला अशोक चव्हाणांनी दांडी मारली आहे.
माजी मंत्री जितू पटवारी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी आज 1 वाजता पत्रकार परिषद बोलावली होती. काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची पत्रकार परिषद होती. मात्र, या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाण आलेच नाही. पत्रकार परिषदेत नाव असताना सुद्धा चव्हाण गैरहजर आहे. मुंबईमध्ये अमित शहा यांचा दौरा असल्याने पत्रकार परिषदमध्ये गैरहजर असल्याचे बोलले जात आहे. या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण हे पक्ष सोडण्याबद्दल बोलण्याची शक्यता होती. मात्र, चव्हाण न आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.