Advertisement
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आता चर्चेत आला आहे. आज दिवसभराचा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पाहिला तर फक्त गणेश मंडळाचा दौरा इतकचं काय ते आजचे काम असल्याचे समोर आले आहे.
राज्यात अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अजूनही शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाड्यातील काही भागांची पाहणी केली. पण, अजूनही कोणताचा ठोस निर्णय झालेला नसल्यामुळे विरोधक टीकेची झोड उठवत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून गणेश मंडळाच्या दर्शनात व्यस्त आहे. अशातच आजचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन हे मंत्रालयापासून ते मंडळापर्यंतच असल्याचे समोर आले आहे. फक्त सकाळी शिक्षक दिनानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे हे राज्यातील शिक्षकांशी संवाद साधणार आहे. हा संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच होणार आहे. त्यानंतर ते भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. त्यानंतर संपूर्ण दिवस गणेश मंडळाच्या भेटीचा दौरा असं नियोजन केले आहे.