#

Advertisement

Wednesday, September 14, 2022, September 14, 2022 WIB
Last Updated 2022-09-14T17:26:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

एकनाथ शिंदेंनी थोडे दिवस त्यांचं पद अजित पवारांना द्यावं !

Advertisement

मुंबई : 'मोठ्या प्रोजेक्टचं आश्वासन मिळालं असेल तर, एकनाथ शिंदेंनी थोडे दिवस त्यांचं पद अजितदादा पवारांना द्यावं, तुम्हाला आम्ही दुसरं पद देतो, तयार आहेत का ते? अजितदादांना मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदेंना आम्ही दुसरं मोठं पद देतो. त्यांना जशी ऑफर मिळाली आहे, तशी ऑफर मी त्यांना देते,'  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी हे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून जाण्याला शिंदे सरकार आणि भाजपला जबाबदार धरलं आहे, '3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राला ऑन मेरिट मिळणार होती, आपण मेरिटमध्ये पास झालो होतो, पण केंद्र सरकार आपल्याकडून काढून घेत आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे', मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जावं, ऑन मेरिट आम्हाला जे मिळालं होतं, ते आमच्याकडे राहिलं पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.