#

Advertisement

Thursday, September 15, 2022, September 15, 2022 WIB
Last Updated 2022-09-15T11:17:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फॉक्सकॉनसाठी शिंदे सरकारची धावाधाव.., मोदींची घेणार भेट

Advertisement

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे.
राज्यात सध्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी, राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेणार आहेत्यामुळे वेदांता-फॉक्सकॉन वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं प्रकरण ताजं असताना रायगड जिल्ह्यातला प्रस्तावित बल्क ड्रग्ज पार्कही गुजरातमध्ये नेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. बल्क ड्रग्ज पार्क रायगडमध्ये उभारण्याचं निश्चित झालं होतं. पण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारणार असल्याचं जाहीर करण्यात आल आहे.