Advertisement
नागपूर : शिवसेनेचे 40 आमदार, 10 अपक्ष आणि 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले, याशिवाय शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला. आता मात्र उद्धव ठाकरेंकडे असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखाने एकनाथ शिंदेंकडे न जाता थेट भाजपचा रस्ता धरला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अमरावती जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये राजेश वानखेडे यांच्यासह अमरावती जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.