Advertisement
पुणे : 'नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते ही यांची विश्वासहर्ता यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या, मी खंबीर आहे' असं म्हणत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सणसणीत टोला लगावला.
भाजपचा उमेदवार येणाऱ्या निवडणुकीत एक लाख मतांनी बारामतीतून निवडून येईल, असा दावा बावनकुळे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर अजिततादांनी.., बावनकुळे नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते ही यांनी काय गप्पा माराव्या, असा सणसणीत टोला अजितदादांनी बावनकुळे यांना लगावला.