#

Advertisement

Monday, October 31, 2022, October 31, 2022 WIB
Last Updated 2022-10-31T11:41:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्रात येणार आता 2 नवे प्रकल्प !

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रातून एकापाठोपाठ 5 प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अखेर ड्रमेंज कंट्रोल करण्यासाठी शिंदे सरकारने धावाधाव सुरू आहे. आता महाराष्ट्रात आता दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात 2 प्रकल्प आणण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील अधिकारी पुण्यात येऊन गेले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुद्धा केली होती. त्यानंतर आज आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्लीत घोषणा केली आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहेतस अशी घोषमा केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्लीत केली आहे. या योजनेतंर्गत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर पाच हजार रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येत आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तर CDAC ही कंपनी 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे एकूण 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन कंपनी पुण्यात करणार आहेत.