Advertisement
सोलापूर : हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय
स्पर्धेसाठी खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन शाहू शिक्षण
संस्थेच्या संचालिका तथा बहुजन रयत परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला
प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी दिले.
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर
संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय जुळे सोलापूर येथे "सोलापूर
म्युचर खो-खो असोसिएशन'चे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर
जिल्हा पुरूष संघाच्या खो-खो प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे
यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खेळाडूंसाठी भविष्यात
प्रशिक्षण शिबिर, स्पर्धा संयोजन करून खेळाडूंसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल,
असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पुणे येथे झालेल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेतून
उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून सर्वाधिक गुण घेऊन पुरस्कार मिळवलेला रामजी कश्यप याचा
सत्कारही ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी स्वामी
विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूरचे माजी प्राचार्य तथा महात्मा
गांधी विद्यालय वाघोलीचे मुख्याध्यापक अंबादास पांढरे, सोलापूर म्युचर खो-खो
असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण, न्यू सोलापूर क्लबचे उपाध्यक्ष संतोष कदम,
सोलापूरचे माजी खजिनदार रवींद्र नाशिककर, महात्मा फुले गिरणीचे संचालक यश आठवले,
महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतीगृह संघटनेचे उपाध्यक्ष व शांतिनिकेतन शिक्षण
संस्थेचे सचिव दत्तात्रय पाटील, ज्ञानज्योती प्राथमिक मराठी विद्यालयाचे
मुख्याध्यापक जनार्दन चव्हाण, निवड समिती सदस्य युसुफ शेख, क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण
कोळी, किरण स्पोर्टस्चे संस्थापक अध्यक्ष मोहन रजपूत, जिल्हा परिषद शाळा कणबसचे
सहशिक्षक शेखलाल शेख, नागणसूर जिल्हा परिषद सहशिक्षक कलखांबकर, क्रिकेट मार्गदर्शक
मनोज रायचूरकर यांच्यासह जिल्ह्यातून आलेले खो-खो खेळाडू,किरण स्पोर्टसचे व स्वामी
विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय जुळे सोलापूरचे सर्व खेळाडू उपस्थित होते.
