Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. पुढील तीन दिवस शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. 2 नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.
आज पासून 2 नोव्हेंबरपर्यंत शरद पवार हे हॉस्पिटलमध्ये असणार आहे. 2 नोव्हेंबरला संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर 3 तारखेला शरद पवार हे शिर्डी येथील नियोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. याआधीही मागील वर्षी मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास झाला होता. शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती.
