#

Advertisement

Saturday, October 22, 2022, October 22, 2022 WIB
Last Updated 2022-10-22T13:08:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिवसेना आता संपत आली आहे ; 4 आमदार आपल्या संपर्कात !

Advertisement


मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये बंडखोरीमुळे मोठी गळती लागली आहे. आताही, मिलिंद नार्वेकर यांच्या शिवसेना सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आता संपत आली आहे, 4 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला नारायण राणे हजर होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना राणेंनी मोठा दावा केला. उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिला ? शिवसेना संपले ना! ५६ आमदारावरून आता ६-७ वर आली आहेत. त्यातील काही जण हे ऑन द वे आहेत. कधी ही ते सहभागी होतील. माझ्या
शिधा वाटपाला काहीही उशीर झाला नाही. फोटो लावला तर काय बिघडलं. एवढं त्रास होत असेल तर कागद लावून पाकीट फोडा. एवढं वाईट वाटत असेल तर.. फोटोमुळे आक्षेप घेणं ही संकुचित वृत्ती झाली. काही उशीर झालं नाही,हे राजकारण सुरू आहे. आता काही हातात राहील नाही तर घरबसल्या षडयंत्र करत राहायचं एकच काम आहे, अशी टीकाही राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.४ आमदार संपर्कात आहेत. उद्या सांगेल भेटा, असा दावाच राणेंनी केला आहे.