Advertisement
बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री झाल्याचा उद्धव ठाकरे वारंवार दावा करत असतात. पण, '1996 च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. यासाठी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आमदारांचं लॉबिंग करून मागणी केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे.
1995 च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी आमदारांचा गट तयार करून लॉबिंग केली होती. बाळासाहेब ठाकरे यांना भेटावं आणि त्यांच्या कानावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी करण्यास सांगितले होते. मनोहर जोशी यांना पायउतार करून स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं, असं खळबळजनक वक्तव्य सुरेश नवले यांनी केलं आहे. 'उद्धव ठाकरे यांचा दाखवायचा चेहरा पडद्यावरचा आणि आतला चेहरा वेगळा आहे. राज ठाकरे, नारायण राणे यांनी पडद्याआडच्या चेहराचा अनुभव सगळ्यांनी घेतला आहे, , असा आरोप नवले यांनी केला आहे.
