#

Advertisement

Monday, October 10, 2022, October 10, 2022 WIB
Last Updated 2022-10-10T11:50:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पडोळकरवाडी आश्रम प्रशालेस राज्यस्तरीय पुरस्कार, हे साहेबांच्या संस्काराची बीजे खोलवर रूजल्याचे प्रतिक : ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे

Advertisement

मंगळवेढा : येथील पडोळकरवाडी आश्रम प्रशालेस "राज्यस्तरीय आदर्श माध्यमिक शाळा पुरस्कार' प्राप्त झाला. हा सन्मान म्हणजे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे साहेबांच्या विचार, संस्काराची बीजे खोलवर रूजली असल्याचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केले.
राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 2022-23 या वर्षाच्या राज्यस्तरीय
शैक्षणिक व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पडोळकरवाडी आश्रम प्रशालेस "राज्यस्तरीय आदर्श माध्यमिक शाळा पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र व मानचिन्ह राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याबाबत ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी पडोळकरवाडी आश्रम प्रशालेचे सर्व प्रशासकीय मंडळासह शिक्षक वृंद तसेच कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत प्रशालेच्या यशाची वाटचाल करीत असताना प्रा. लक्ष्मण ढोबळे साहेबांच्या विचारांची जपणूक करण्यास सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ, माजी महापौर अरुणा वाकसे , ह. दे. प्रशालेचे प्राचार्य मातीबंण्णे तसेच मंगळवेढा तालुकाप्रमुख सुभाष गायकवाड, राजेंद्र माळी, माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य राजेंद्र पोतदार, पर्यवेक्षक उत्तम कलुबर्मे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील साळे व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
दरम्यान, पडोळकरवाडी आश्रम प्रशालेस पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, संस्थेचे उपाध्यक्ष महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे, सचिव सिद्राम जावीर तसेच संस्थेच्या प्रशासन अधिकारी क्रांती आवळे आदींनी अभिनंदन केले.