Advertisement
सांगोला : राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. पण, 'एकनाथ खडसे यांचा पुन्हा भाजप प्रवेश होणे. हा काही सोपा विषय नाही' असं सांगत एकनाथ खडसेंची घरवापसी कठीण असल्याचे भाजपचे नेते आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगोला दौऱ्यावर होते. यावेळी खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. 'नाथाभाऊंचे जाणे दुःखद होते. एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. पण, एकनाथ खडसे यांचा पुन्हा भाजप प्रवेश होणे. हा काही सोपा विषय नाही. नाथाभाऊंचा पक्ष सोडण्याच्या कारणावर आधी चर्चा होईल. मगच निर्णय होऊ शकतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, 'गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यावेळी एकदा भेटूया, सगळं मिटवून टाकू, असा खुलासा महाजन यांनी केला होता. पण, मी अशी कोणतीही मागणी फडणवीस यांच्याकडे केली नव्हती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
