#

Advertisement

Thursday, October 6, 2022, October 06, 2022 WIB
Last Updated 2022-10-06T17:55:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दसरा मेळाव्यानंतर वेगवान घडामोडी

Advertisement

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. या मेळाव्याच्या 24 तासांमध्येच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार अमित शाह यांच्या भेटीला गेले आहेत.
शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. तसंच येत्या काही महिन्यांमध्ये मुंबईसह राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका म्हणूनही पाहिलं जात आहे. याशिवाय अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचीही घोषणा झाली आहे. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतरच्या या पहिल्याच निवडणुका असतील, त्याआधी अमित शाह, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.