#

Advertisement

Thursday, October 6, 2022, October 06, 2022 WIB
Last Updated 2022-10-06T12:27:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

ऍड. कोमलताईंनी केल्या भाकरी....

Advertisement

सोलापूर : आपल्याकडे घरचे खाऊन लष्करातल्या भाकऱ्या भाजणे, ही म्हण प्रचलित असली तरी सुरवातीपासूनच वडीलांबरोबर बाहेर पडल्याने कार्यकर्त्यांच्या घरी जेवण. त्यामुळे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी कधीही वडापाव, मिसळपाव आणि चमचमीत जेवणाला जवळ केलं नाही. आजही कार्यकर्त्याच्या घरची भाकरी गोड लागत असल्याचे ते सांगतात. हेच संस्कार त्यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्यातही आल्याचे सर्वांनीच वेळोवेळी पाहिले आहे, याचा अनुभव पुन्हा एकदा एका राजकीय दौऱ्यावर आला. विशेष म्हणजे कोमलताईंनी स्वत:त्या घरगुती खानावळीच्या चुलीचा ताबा घेत भाकरी थापल्या.
याबाबत ऍड. कोमलताईंना विचारले असताना अतीशय साधेपणाने त्यांनी सांगितले की, आईने बडवू बडवू भाकरी तयारी करायला अगदी लहान वयातच मला शिकवलं. घरच्या भाकरी खाऊन पक्षा कार्याला वाहून घेण्याचे आमच्या कुटुंबाचे संस्कार आहेत. राजकीय पक्षांचे मेळावे, बैठका म्हटले की, चमचमीत खाणे, शाही थाट अशी अपेक्षा अनेकांना असते. पण, वडीलांनी आवर्जून काही गोष्टींना फाटा दिला. घरात तेंव्हा आणि आजही किमान 50 लोक तरी असतात. त्यामुळे भाकरी थापण्यासाठी आईने सुरवात केली की, आम्ही बहिणीही मदत करायला जायचो. आसपासच्या काही मायभगिनीही मदतीला यायच्या. चुलीतला जाळ सारखा करत, लोखंडी तव्याचं तापमान योग्य ते राखत भराभर भाकरी थापून तव्यावर टाकून आधीची भाकरी चुलीच्या तोंडाशी नीट शेकून दुरडीत ठेवायची, हे सगळ आईच पाहून शिकले.
आजही दौरा करताना सुरवातीलाच दोन दिवसाच्या भाकऱ्या, चटणी बांधून घेतली जाते. आम्हालाही तशीच सवय अंगवळणी पडली. साध जेवण आम्हाला सर्वांनाच आवडतं. इथे जेवणासाठी थांबून भाकरी मागितली. पण, भाकरी करण्यासाठी माय माऊली एकटीच होती. आम्ही खाणारे जास्त जण होतो. म्हणूनच तीच्या मदतीला जात परतीत पीठ ओढत भाकरी करायला घेतली. कार्यकर्त्यांना जेवू घातले त्याचे मोठे समाधान मिळाल्याचे ऍड. कोमलताईंनी सांगितले. यातून सर्वांनी मात्र एक अनुभव घेतला की, एक स्त्री कितीही मोठ्या पदावर असली आणि कुठल्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी स्वयंपाकासाठीची गडबड उडालेली दिसली की ती स्वस्थ थांबू शकत नाही. त्या स्त्रीमधील आई-भिगनीच्या रूपातील "अन्नपूर्णा' जागृत होते. सलाम तुम्हाला कोमलताई,,,असे शब्द जेवण करताना कार्यकर्त्यांतून अपसुक उमटत होते.