#

Advertisement

Friday, October 14, 2022, October 14, 2022 WIB
Last Updated 2022-10-14T11:53:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

देशमुख रुग्णालयात दाखल; ऍजिओग्राफी करावी लागणार

Advertisement



मुंबई :
 राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार आहे. अँजिओग्राफीत ब्लॉकेज निघाल्यास पुढील उपचार केला जाणार आहे. विशेष म्हणजे देशमुख हे गेल्या अकरा महिन्यांपासून मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांप्रकरणी जेलमध्ये होते. त्यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी हायकोर्टाने गेल्या आठवड्यात दिलासा दिला होता. ईडीने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला होता. पण सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. हा विरोध अद्यापही तसाच आहे. त्यामुळे देशमुखांना जामीन मिळण्यास अडचणी आहेत. सीबीआयने अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाला का विरोध आहे, याबाबतचे काही मुद्दे कोर्टात सादर केले आहेत.