#

Advertisement

Friday, October 14, 2022, October 14, 2022 WIB
Last Updated 2022-10-14T11:58:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

एकनाथ खडसे पोलीस स्टेशनसमोरच झोपले...

Advertisement

जळगाव : जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गेल्या 18 तासांपासून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी ठिय्या आंदोलन पुकारले होते. अखेरीस खडसेंनी ठिया आंदोलन स्थगित दिली आहे. या प्रकरणी आता खडसे न्यायालयात दाद मागणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत दूध संघात झालेला गैरव्यवहार हा गैरव्यवहार नसून तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी झाली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. यासाठी तब्बल 18 तास खडसेंनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. एकनाथ खडसे पोलीस स्टेशनसमोरच झोपले होते. 
आज सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाऊन खडसेंची भेट घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत खडसे यांच्यासोबत चर्चा केली. बंदद्वार चर्चेनंतर एकनाथ खडसेंनी ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट केलं. दूध संघातील कोट्यावधींच्या चोरी प्रकरणी मात्र गुन्हा दाखल नाही. याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असून न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.