#

Advertisement

Saturday, October 1, 2022, October 01, 2022 WIB
Last Updated 2022-10-01T12:11:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

अमोल कोल्हे यांनी घेतली अमित शाह यांची भेट

Advertisement

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमोल कोल्हे यांनी अमित शाहांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 
पण, ही भेट 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटाच्या निमित्ताने असल्याचं कोल्हे यांनी म्हटले आहे. पण, शाहांची भेट घेतल्याने मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांचा सिनेमा लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेला दे धक्का देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  याचे प्रमोशन कोल्हे करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने भेट घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कोल्हे यांनी अमित शाह यांची भेट घेत, त्यांना या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी निमंत्रण देखील दिले आहे.