Advertisement
धाराशिव : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं भाषण म्हणजे एरवी कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असते. मात्र यावेळी अजित पवारांनी धाराशिवमधील एका कार्यक्रमात स्टेजवर चक्क हिंदी गाणं गायलं. त्यांचं भाषण सुरू असताना त्यांना एकामागून एक चिठ्ठ्या देण्यात आल्या. तेव्हा घे रे त्याची चिठ्ठी..., असं म्हणत त्यांनी स्टेजवर 'चिठ्ठी आयी है' हे गाणं गायलं. यावेळी कार्यकर्त्यांनीही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत त्यांच्या गाण्याला दाद दिली.
पण, यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनी दिलेलील चिठ्ठी वाचत तक्रारीची दखल घेत कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं. मी साखर आयुक्तांशी बोलतो. राणाचा असो किंवा कोणाचाही कारखाना असो, भाव दिलाच गेला पाहिजे, मी राणाशी पण बोलीन, राणा भाजपमध्ये गेला म्हणजे आमचं बोलणं बंद आहे अशातला भाग नाही. त्याला पण विचारेन की वस्तुस्थिती काय आहे" असं अजित पवार यांनी ही चिठ्ठी वाचल्यानंतर म्हणाले.
